बीड

लालबहादूर शास्त्री संकुलनात दिव्यांग रोजगार मेळावा

लालबहादूर शास्त्री संकुलनात दिव्यांग रोजगार मेळावा

कर्णबधिर व अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी सुवर्ण संधी!

*अंबाजोगाई, (प्रतिनिधी) बालाजी देशमुख* : अंबाजोगाई तालुक्यातील भारज पाटी येथील लालबहादूर शास्त्री संकुलनात डॉ.रेड्डीस फाऊंडेशन व श्रीराम कर्णबधिर निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ( ता.२८ ) रोजी दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास व रोजगार विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डॉ.रेड्डीस फाऊंडेशनचे श्री. महेश भावले, श्री. धम्मानंद संध्यान, बीड जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे अधिकारी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुश नखाते, अंबाजोगाई येथील गटशिक्षणाधिकारी मधुकर स्वर्णकार, दत्तात्रय सूर्यवंशी, ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. सोबत येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, दहावी/बारावी पास मार्कशीट, पासपोर्ट साईजचे फोटो व कागदपत्रे आणावेत. सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या कार्यक्रमास दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहवे असे अहवान लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव दशरथ शिंदे यांनी केले.

Back to top button