देशविदेशमहाराष्ट्रराजकीय

मराठा आरक्षणासाठी आमदार मेटे रस्त्यावर तर ओबीसी आरक्षण रद्द झाले तरी ओबीसीचे महानायक सत्तेच्या खूर्चीवर – लक्ष्मण ढवळे

बीड प्रतिनिधी :- मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण देता येत नाही म्हणुन जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या व राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजु व्य्‍वस्थीत न मांडल्यामूळे त्या विरोधात आमदार विनायकरावजी मेटे यांनी बीड येथे शिवसंग्राम तर्फे मराठा क्रांती मोर्चा काढुन स्व्‍त: रस्त्यावर उतरून त्याचे नेतृत्व केले. राज्य सरकारने मोर्चा निघणार नाही या साठी जिल्हाधिकारी बीड यांना विशेष अधिकार देवुन मोर्चा निघणार नाही याची पोलीस प्रशासनास नाकेबंदी करण्याचे आदेश दिले होते.

            तरीही आमदार विनायकरावजी मेटे यांच्या आवाहानास बीड जिल्हातील मराठा समाजासह मुस्लीम समाज व ओबीसी समाजाने देखील मोर्चा मध्ये हजारो हजारोच्या संख्येने मराठा आरक्षण साठी आमदार विनायकरावजी मेटे यांच्या सोबत रस्त्यावर उतरून मोर्च यशस्वी केला हे सर्व होत असताना ओबीसी आरक्षण रदद केले आहे. असा निर्णय देण्यात आला यास देखील राज्यसरकारची भूमीका संसयास्प्द आहे परंतू ओबीसी आरक्षण रदद झाले तरी ओबीसीचे महानायक सत्तेच्या उबदार खूर्चीवर आरामात बसलेले दिसत आहेत. या वरून एक लक्षात येते की ओबीसी चा महानायकास ओबीसी आरक्षणाचे काहीही देणे घेणे नाही त्यांना फक्त सत्तेची खूर्ची प्रीय आहे. तसे पहाता ओबीसीच्या आरक्षपणासाठी कोणताही ओबीसी नेता रस्त्यावर उतरला नाही ओबीसी समाजाला आरक्षण महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील 340 व्या कलमाच्या आधरे मिळाले  व ते मिळावे म्हणुन त्याचा पाठपुरावा आंबेडकरी चळवळीने केला होता आणी मॅडल आयोग लागू व्हावा या साठी सर्वात मोठे योगदान काशीराम यांचे होते. ओबीसीचा एकही महानायक या साठी रस्ता गरम करण्यासाठी रस्त्यावर उतरला नाही हे वास्तव आहे. आज ज्या प्रकारे मराठा आरक्षणासाठी आमदार विनायकरावजी मेटे हे रस्त्यावर उतरतात तसे ओबीसी आरक्षण रदद झाल्यावर देखील ओबीसीचे महानायक सत्तेच्या खूर्चीवर चिटकून बसलेले दिसत आहेत. ओबीसी समाजाने आता झोपेतुन जागे होवुन आपल्या आरक्षणासाठी प्रचंड लढा उभारला पाहिजे असे पत्रक ओबीसी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे  जेष्ठ नेते व माळी महासंघाचे मा. अध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

 

Back to top button