📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

साकत येथील साकेश्वर रामेश्वर गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप

साकत येथील साकेश्वर रामेश्वर गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप

समाजसेवक निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त महासंग्राम युवा मंच चा कौतुकास्पद उपक्रम

जामखेड प्रतिनिधी – दि.१६समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकत येथील साकेश्वर रामेश्वर गोपालन संख्या साकत संचलित साकेश्वर रामेश्वर गोशाळा येथे आज रोजी १६ मार्च रोजी दुपारी महासंग्राम युवा मंच यांच्या वतीने गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर,युवा नेते अमृत भोसले, नंदादीप कन्स्ट्रक्शन चे अक्षय म्हेत्रे,राहुल पवने,राम निमोणकर, दिगंबर म्हेत्रे,मनोज वराट, विकास राऊत, बंडू हुलगुंडे, विशाल कदम, अतुल जगताप, धनंजय हुलगुंडे,राम राऊत, विष्णू म्हेत्रे, अशोक निमोणकर, अनिकेत हुलगुंडे गोशाळेचे संचालक आजिनाथ पुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

*चौकट*
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना निलेश (भाऊ) गायवळ यांनी यापूर्वी अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या काळात आरोळे कोविड हॉस्पिटलला कोरोना बाधित असलेल्या पेशंट साठी औषध उपचार तसेच हाताला काम नसलेल्या लोकांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील अनेक व्यक्तींना मदत दिली होती. या सर्व घटनेचा जामखेड तालुका साक्षीदार आहे. त्याचबरोबर दुष्काळात टँकर ने पाणी वाटपाचे काम तसेच साकत येथील गोशाळेसाठी वाढदिवसानिमित्त पत्र्याचे शेड उभारले होते. आजही त्यांचे समाजसेवेचे काम सुरू आहे.

*महेश निमोणकर*
तालुका अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जामखेड तालुका

Back to top button