जामखेड पब्लिक स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा उत्साहात

जामखेड पब्लिक स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा उत्साहात
नगराध्यक्ष प्रांजलताई चिंतामणी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
जामखेड प्रतिनिधी: दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड पब्लिक स्कूल जामखेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ७७ वा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ प्रांजलताई अमित चिंतामणी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितावर नृत्य सादर करून मान्यवरांची मने जिंकली, विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली मनोगत व्यक्त केली व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी जामखेड नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली म्हेत्रे ,सौ.नंदा होळकर,सौ.सिमा कुलकर्णी,सौ.जया गव्हाळे व याचबरोबर दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सचिव अरुण चिंतामणी, उपसचिव डॉ. सुनिल कटारिया, संचालक दीपक होशिंग,संचालक रामनाथ परदेशी ,माजी सचिव शशिकांत देशमुख,माजी खजिनदार राजेश मोरे , माजी संचालक सैफुल्ला खान, जामखेड पब्लिक स्कूल जामखेड प्राचार्य सुजित उबाळे आदी शिक्षक पुराणे सर,खरात सर,शिक्षिका सौ.स्मिता डहाळे, रेश्मा चव्हाण ,कल्याणी सातपुते , सौ रुक्मिणी जिरेकर सौ.वैशाली हजारे,सौ.रेखा भोगील सौ. आकांक्षा फलके,सौ.आरेकर मॅडम,सौ.पठारे मॅडम,सौ.काकडे मावशी,राहुल पुलावळे तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



