बीड

सनराईज शैक्षणिक संकुलात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सनराईज शैक्षणिक संकुलात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जामखेड प्रतिनिधी : प्रजासत्ताक २६ जानेवारी रोजी सनराईज शैक्षणिक संकुल संचलित साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज तसेच सनराईज इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनराईज शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. संजय भोरे, तसेच सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम, संचालक प्रा. तेजस भोरे, शिंदे मॅडम, यशराज भोरे, शुभम शिंदे, पाडळी गावचे उपसरपंच प्रकाश पवार तसेच प्रमुख पाहुणे सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजपूजन करून राष्ट्रध्वज अभिमानाने फडकविण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगत सादर करून संविधानाच्या मूल्यांची प्रभावी मांडणी केली. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. तेजस भोरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा, शिस्त आणि संविधाननिष्ठेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील घाडगे यांनी केले, तर सर्वांना बिभीषण भोरे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे सुनील शिंदे सर, पाडळी गावचे उपसरपंच प्रकाश पवार,शरद भोंडवे सरपंच घोडेगांव,डॅा.विशाल बोराटे, विकास कार्ले, सागर कार्ले,योगेश सोले,बुवासाहेब काळे सचिन भोगल व रमेश भोगल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Back to top button