बीड
सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांनी संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा सारखे हिरे घडवले – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

नेकनूर दि.08(प्रतिनिधी)ः- सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांनी संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा सारखे हिरे घडवले तसेच लोक पावलेली वारकरी परंपरा पुनर्जीवित करण्यासह संप्रदायाला बळ देण्याचं काम बंकट स्वामी महाराज यांनी केले. असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
श्री क्षेत्र नेकनूर येथे संत बंकट स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, संभाजी महाराज आगळे, भास्कर महाराज शिंदे, ह.भ.प.स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज, ह.भ.प.किसन महाराज पवार, ह.भ.प.नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव, दिनकर कदम, अरुण डाके. विलास बडगे, नानासाहेब काकडे, भारत काळे, राजाभाऊ शेळके, सखाहरी गदळे, महेंद्र फुटाणे, बाजीराव काळे, गणेश पाटील, अभिमान शिंदे, राजाभाऊ शेळके, पोपट मते, चक्रधर शिंदे, अभिमन्यू काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीक्षेत्र नेकनूर येथे सुरू असलेल्या संत बंकट स्वामी महाराज यांच्या 81 व्या पुण्यतिथी उत्सवात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात काकडा भजन, किर्तन परंपरेला समृद्ध करण्याचे श्रेय संत बंकस्वामी महाराज यांना जाते त्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे 24 वर्ष अध्यक्षपद भूषवले. लोक पावलेली वारकरी परंपरा पुनर्जीवित करण्यासह संप्रदायाला बळ देण्याचं काम बंकट स्वामी महाराज यांनी केले. संत वामन भाऊ, संत भगवान बाबा यांना घडवण्याचे काम बंकट स्वामी महाराजांनी केले. स्वातंत्र्याच्या अगोदर बहुजनातील सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना सांप्रदायाचा कीर्तन भजनाचा अधिकार दिला व जाती तोडा आणि समाज जोडा हा मोलाचा संदेश बंकट स्वामी महाराजांनी दिला. बंकट स्वामी संस्थांचा आज विकास होत आहे यात खारीचा वाटा म्हणून जो काही हातभार लावता येतो तो मी नेहमी संस्थानचा भक्त या नात्याने कायम सेवेत राहील असेही ते म्हणाले. यावेळी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.