बीड

गावगाड्यातील पत्रकारांच्या प्रमुख मागण्या सभागृहात मांडणार – आमदार सदाभाऊ खोत

गावगाड्यातील पत्रकारांच्या प्रमुख मागण्या सभागृहात मांडणार – आमदार सदाभाऊ खोत

बीड येथे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची भेट…

बीड (प्रतिनिधी):- वर्तमानपत्रासह विविध माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांच्या मुलांना शिक्षणात सवलत मिळणे आवश्यक आहे.सरकार समाजातील सर्वच घटकांना मदत करीत असेल तर गावगाड्यात काम करणाऱ्या पत्रकारांनाही मदत केली पाहिजे. यासाठी पत्रकारांच्या प्रमुख मागण्या सभागृहात मांडून सरकारचे लक्ष वेधू अशी ग्वाही आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.बीड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली.

बीड जिल्ह्यात दौऱ्यावर असताना रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (दि. २७ जुन२०२५ )रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मुंडे यांनी स्वागत करून दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेची माहिती पुस्तिका आणि सरकारकडील प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन आमदार खोत यांना दिले. सदाभाऊ खोत यांनी शिराळा येथे पत्रकार संवाद यात्रेचे स्वागत करून पाठिंबा दिला होता.याची आठवण करत खोत यांनी पत्रकारांच्या मुलांना  शिक्षणासाठी सवलत आवश्यक असल्याचे मत मांडले. तर पेन्शन पासून इतरही मागण्या बाबत आपण सभागृहात विषय उपस्थित करून आणि सरकारचे लक्ष वेधू. सरकार सर्व घटकांना मदत करण्याची भूमिका घेत असेल तर वर्तमानपत्रासह इतर माध्यमातून गावगाड्यात काम करणाऱ्या पत्रकार या घटकालाही मदत केली पाहिजे. अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडणी. संवाद यात्रेनंतर सरकारने विक्रेते आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र दोन महामंडळांची घोषणा केली आहे.मात्र हे महामंडळ कार्यान्वित व्हावे यासाठीही प्रयत्न करू असे खोत यांनी सांगितले यावेळी.यावेळी  रयत क्रांती चे नेते पै भीमराव अण्णा माने, राज्य उपाध्यक्ष राहुल माने बीड जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव आणि राजाभाऊ बहिर उपस्थित होते.

Back to top button