महाराष्ट्र

वानखेडेंचे कुटुंब हिंदूच असल्याचं सांगणाऱ्या क्रांती रेडकर यांची माहिती खोटी

 

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली आहे.

डॉ. जाहीद कुरेशी म्हणाले की, समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते. शबाना कुरेशीसोबतचा विवाह मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार पार पडला होता. समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद होते, समीरच्या बहिणीचेही लग्न मुस्लिम कुटुंबात झाले आहे तसेच ते पहिल्यापासून मुस्लिमच होते अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.

समीर वानखेडेंचे कुटुंब हिंदू आहे हे आम्हाला माहित नव्हते. जेव्हा हे प्रकरण मीडियामध्ये आले तेव्हा आम्हाला कळले की ते हिंदू आहेत. समीर वानखेडेंची आई मुस्लिम होती आणि आमचे त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते असंही डॉ कुरेशी म्हणाले. तसेच, सध्या आम्हाला या प्रकरणात पडण्याची गरज नाही आणि आम्हाला यावर बोलायचेही नाही असं डॉक्टर कुरेशी यांनी सांगितलं.

मात्र आम्ही एंगेजमेंट झाल्यानंतर चौकशी केली होती आणि त्यांच्या वडिलांनी देखील तेच म्हटलं होतं. ते कुटुंब मुस्लिम असल्यानेच आम्ही लग्नाला होकार दिला होता आणि त्यानंतर निकाह मुस्लिम धर्माच्या प्रथेप्रमाणे पार पडला होता. आम्ही त्यांच्या कुटुंबाला चार वर्षांपासून ओळखत होतो आम्ही त्यांच्या घरी देखील जायचो आणि त्यानंतर खात्री झाल्यानंतर दाऊद वानखेडे म्हणाले की आम्ही धर्म बदललेले मुस्लिम आहोत ते जी कागदपत्र आज दाखवत आहेत ती जुनी कागदपत्र आहेत आणि जुन्या कागद पत्रांवर अर्थात जुना रेकॉर्डच असणार असं डॉ. जाहीद कुरेशी म्हणाले.

Back to top button