मुंबई

क्रूझ ड्रग्ज पार्टीचा आयोजक समीर वानखेडेंचा मित्र, नवाब मलिक यांचा आणखी एक गंभीर आरोप

 

सध्या संपूर्ण राज्यभरात नाही तर देशभरात एनसीबीने कॉर्डिलिया क्रूझवर टाकलेली धाड आणि त्यामुळे निर्माण झालेला ऍड चांगलाच चर्चेत आला असून आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट यांच्यासहीत आठ जणांना अटक केली. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर नवाब मलिक यांनी तीन दिवसातच पत्रकार परिषद घेतली आणि ही सगळी कारवाई बनाव असल्याचं सांगत थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप लगावले होते. मात्र दुसरीकडे समीर वानखेडे यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत त्या पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडेवर आरोप लगावला आहे.

कॉर्डिलियावरची पार्टी जर एफ टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी आयोजित केली होती. तर त्यांना अटक का झाली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. नवाब मलिक यांनी जारी केलेल्या कॉर्डिलियावरच्या पार्टीतल्या व्हीडिओमध्ये काशिफ खान आपल्या गर्लफ्रेन्डसोबत दिसत आहेत आणि असं असतानाही, पार्टीच्या आयोजकाला का अटक केली नाही, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

तसेच नवाब मलिक यांनी काल क्रूझ पार्टीमध्ये एक दाढीवला होता आरोप केला तो हा काशिफ खान असल्याची माहिती आहे. काशिफ खान फॅशन टीव्हीचा chairman आहे. त्याने क्रूझ वर पार्टी आयोजित केली होती. काशिफ खान आणि समीर वानखेडे हे घनिष्ठ मित्र असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली नाही, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Back to top button