📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी अलिशा पठाणचा पहिला रोजा पुर्ण

वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी अलिशा पठाणचा पहिला रोजा पुर्ण

जामखेड – रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करतात .

जामखेड येथील सदाफुले वस्ती
भागात राहणारे मजहर खान यांची मुलगी अलिशा मजहर पठाण (वय ४) या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीने पवित्र रमजान महिन्यात उपवास ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढ्या लहान वयात अलिशाने उपवास केल्यामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत असून नातेवाईक, मित्रपरिवार व पाहुण्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
अलिशाच्या या भक्तीभाव आणि उत्साहाचे सर्वांनी स्वागत केले असून तिच्या कुटुंबीयांनाही याचा अभिमान वाटत आहे. लहान वयातच धार्मिक संस्कार आणि श्रद्धा जपल्यामुळे अलिशा खान हिचे समाजातून विशेष कौतुक केले जात आहे.

Back to top button