📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हा परिषदेच्या शाळांना ईमारत बांधकाम, शाळा दुरुस्ती, वीजपुरवठा, स्वच्छतागृहे या पायाभूत सुविधांसाठी निधी द्या ; ना.पंकजाताई मुंडे यांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे 

जिल्हा परिषदेच्या शाळांना ईमारत बांधकाम, शाळा दुरुस्ती, वीजपुरवठा, स्वच्छतागृहे या पायाभूत सुविधांसाठी निधी द्या ; ना.पंकजाताई मुंडे यांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे
—
बीड:- ( दि.०७ ) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाली असुन या शाळांमध्ये शिक्षणाच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आज दि.७  शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीच्या निमित्ताने आलेल्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा संपर्क मंत्री बीड जिल्हा ना.पंकजाताई मुंडे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
   बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यांची पुनर्बाधणी आवश्यक आहे तर ४६८ शाळांमधील ८५६ वरवगखोल्यांची दुरुस्ती आवश्यक आहे.तसेच जिल्हा परिषदेच्या ६३ वस्तिशाळांना स्वतःची इमारत नसल्याने किरायाच्या रूममध्ये, पत्र्याच्या शेडमध्ये, झाडाखाली भरविण्यात येत आहेत त्यांना इमारतीसाठी निधी देण्यात यावा.बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३९२ शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही ,डिजिटल बोर्ड,एलईडी, आदि उपकरणे धुळखात पडुन असुन  एकंदरीतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच अंधारात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असून वीज देयके व इतर कारणांसाठी निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २१६४ शाळांपैकी ३१७ शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव असुन विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबणा होत असुन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Back to top button