जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांना पितृशोक

जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांना पितृशोक
जामखेड प्रतिनिधी: जामखेड शहरासह तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी योगदान देणाऱ्या दोन पिढ्यांचे योगदान देणारे व जामखेडचे दिवंगत सरपंच महादेव (आप्पा) राळेभात व प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचे पिताश्री शाहूराव बाबूराव राळेभात यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता राळेभात वस्ती या ठिकाणी होणार आहे.
गेली अनेक दशकांपासून जामखेड तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात तनमन धनाने काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य व जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जामखेड ग्रामपंचायतचे दिवंगत सरपंच महादेव (आप्पा) राळेभात, यांचेसह गौतम,शहाजी,कै.अनिल, संपत मुले तर मुलगी सौ.कांचन पवार,सूना व नातवंडे असा शाहूराव राळेभात यांचा परिवार होता. त्यांच्या जाण्याने राळेभात परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कै.शाहूराव राळेभात यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून क्षेत्रातील श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.



