बीड

अहिल्यानगर जिल्ह्यात;डॉ. मिसबाह शेख ठरल्या प्रथम ग्लुकोमा सर्जन

अहिल्यानगर जिल्ह्यात;डॉ. मिसबाह शेख ठरल्या प्रथम ग्लुकोमा सर्जन

जामखेड प्रतिनिधी :अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच ग्लुकोमा सर्जन म्हणून डॉ. मिसबाह फारुख शेख यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शहरातील प्रसिद्ध डॉ. फारुख आझम यांची कन्या व डॉ. सादेख पठाण यांची भाची असलेल्या डॉ. मिसबाह शेख यांनी कोईम्बतूर (तामिळनाडू) येथून ग्लुकोमा विषयातील दोन वर्षांची फेलोशिप नुकतीच १ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

डॉ. मिसबाह शेख यांनी एमबीबीएसचे शिक्षण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथून, तर एम.एस. (नेत्ररोग) पदव्युत्तर शिक्षण लातूर येथून प्रथम श्रेणीत पूर्ण केले आहे. बारावीनंतर तब्बल ११ वर्षांचा त्यांचा वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास सातत्याने यशस्वी ठरत गेला असून त्यांचा शैक्षणिक आलेख नेहमीच चढता राहिला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जामखेड शहरातील डॉ. फारुख आझम यांनी आपल्या मुलीचे डॉ. मिसबाह शेख यांचे
हॉस्पिटलमध्ये भव्य स्वागत करुन अभिनंदन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी डॉ. जी. एस.गायकवाड, डॉ. चेतना बहुरूपी, आरीफ भाईजान, जान मोहम्मद पठाण सर, माजी नगरसेवक शामीरभाई सय्यद, अनिल देडे सर, मुकुंद राऊत सर, मोहसिन सय्यद, अरबाज शेख, शहबाज शेख, ॲड. अल्ताफ शेख, उमर शेख (इंजिनिअर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मिसबाह शेख यांच्या या यशामुळे जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात गौरवाची भर पडली आहे.

Back to top button