मुंबई

“आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र ;पुराव्यानिशी जाहीर करणार”

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक सबळ पुरावे सादर करून त्यांचा पितळ उघड पाडलं आहे. तर दुसरीकडे वानखेडे आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. त्यातच आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप मलिक यांनी लगावला आहे.

वानखेडे आणि क्रुझवरील रेव्ह पार्टीतील दाढीवाला ड्रग्ज माफीया यांच्यात दोस्ताना असून त्यामुळेच त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट केले गेले आहे. याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चौकशी समिती आली आहे त्यांनी चेक करावे. त्यात त्यांना काही सापडत नसेल तर जे वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्वरसिंग माझ्याकडे येत असतील तर ते पुरावे द्यायला तयार आहे. माझा चौकशी समितीवर सवाल नाही परंतु हे प्रकरण गंभीर असून ते गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील असा इशारा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत आज दिला.

तसेच समीर वानखेडे याचे मुस्लिम पध्दतीने जे लग्न झाले त्याचा फोटो आणि लग्नपत्रिका ट्वीटरवर शेअर करुन नवाब मलिक यांनी आणखी एका बोगस प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीच्या अधिकार्‍याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे. सीबीसीच्या मार्गदर्शक सुचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही परंतु ज्यापध्दतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होवू शकतो असेही नवाब मलिक म्हणाले.

Back to top button