बीड

सरकारने भगवानगडावर सर्वांत मोठे संत विद्यापीठ उभारावे- ॲड.गुणरत्न सदावर्ते

सरकारने भगवानगडावर सर्वांत मोठे संत विद्यापीठ उभारावे- ॲड.गुणरत्न सदावर्ते

पाथर्डी (प्रतिनिधी) : प्रसिद्ध विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड.डॉ.गुणरत्न सदावर्ते यांनी पाथर्डी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहून आपली ठाम भूमिका मांडली.या दौऱ्याची सुरुवात त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली.चिंचपूर येथे हाॅटेल सह्याद्री पॅलेसचे उद्घाटन,व उद्योजक डॉ.बंडूशेठ भांडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.वरील सर्वच ठिकाणी त्यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले.यावेळी ॲड.जयश्री सदावर्ते,ॲड.प्रताप ढाकणे,एसटी कर्मचारी बँकेचे संचालक दत्तात्रय खेडकर,उद्योजक बंडूशेठ भांडकर,सुभाष खेडकरॲड दिनकरराव पालवे,मा.सभापती गहीनिनाथ शिरसाट,विष्णुपंत ढाकणे,भगवानराव दराडे,रनजीत बेळगे,कैलास कराड,आजिनाथ खेडकर,एसटी बॅंक संचालक,संजय घाडगे,आजित मगरे,आतुल सितापराव,राजेश पानपाटिल,संध्या दहिफळे व इतर अनेक मान्यवर
 उपस्थित होते.
                 पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की,ओबीसी समाज,वंचित घटक यांना कोणीही ट्रोल करत असेल किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.प्रत्येक वेळी संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने ठोस उत्तर दिले जाईल,असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाची दिशाभूल करीत राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित करूनbओबीसी,वंचित व इतर जातींचा कायम अपमान करणाऱ्या मनोज जरांगेला तात्काळ अटक करण्याची मागणी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांच्या कार्याचा उल्लेख करताना सदावर्ते म्हणाले की, श्री क्षेत्र भगवानगडासाठी सरकारने किमान एक हजार एकर जमीन द्यावी आणि त्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे संत विद्यापीठ उभारावे ही काळाची गरज आहे. यामुळे संत परंपरा,सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार होईल,असेही त्यांनी नमूद केले.तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असून,त्यांना सिद्ध होण्यासाठी आणखी काही वेळ द्यावा लागेल.अजित पवार यांच्या विमान उड्डाणापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज का मिळत नाही? असे विचारले असता ॲड.सदावर्ते म्हणाले की,“मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आधीच जाहीर केले आहे.चौकशी सुरू असून,ती पूर्ण झाल्यावर सत्य बाहेर येईल विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी.मात्र यापुढे इतर कुठल्याही योजना अंतर्गत कोणालाही सरसकट पैसे अथवा वस्तू फुकट वाटप करणे योग्य नाही,अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
Back to top button