बीड

मराठा सेवा संघ बीड जिल्हा व ३३ कक्षाची पुनर्बांधणी बैठक शनिवारी 

मराठा सेवा संघ बीड जिल्हा व ३३ कक्षाची पुनर्बांधणी बैठक शनिवारी
 बीड ,: केंद्रीय कार्यकारिणीने सूचना केल्याप्रमाणे मराठा सेवा संघ व ३३ कक्षांच्या पुनर्बाधणीसाठी मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीने नियुक्त केलेल्या समितीची बैठक ०५ जुलै २०२५ शनिवार रोजी आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ४:३० वाजता, शासकीय विश्राम गृह बीड येथे , मराठवाडा निवड समिती प्रमुख शिवश्री संदीपान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे अशी माहिती माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय शेंडगे यांनी दिली आहे.. मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेची स्थापना १ सप्टेंबर १९९० रोजी पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली. गेल्या ३४ वर्षापासून मराठा सेवा संघ संपूर्ण देश- विदेशात ३३ कक्षांच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून सामाजिक कार्य करीत आहे. मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे. मराठा समाजातील सर्वच जाती, पोटजाती, जात घटकातील, शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील सर्वस्तरीय नोकरदार व सेवानिवृत्त तसेच उद्योजक, व्यावसायिक यांनी समाजासाठी विकासात्मक स्वरूपाच्या सेवा उपलब्ध करून देणे हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे. मराठा सेवा संघाचे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणीने सूचना केल्याप्रमाणे मराठा सेवा संघ व इतर कक्षांच्या पुनर्बाधणीसाठी मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीने नियुक्त केलेल्या निवड समितीची बैठक ५ जुलै रोजी होत आहे.. मराठा सेवा संघ व ३३ कक्षांमधील तालुका कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी, विभाग कार्यकारिणी तसेच राज्य कार्यकारिणीवर कार्य करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी आपले अर्ज समितीकडे बैठकीत सादर करावेत. सदरील समितीच्या बैठकीस निवड समिती प्रमुख संदीपान जाधव यांच्या समवेत निवड समितीचे सदस्य अशोक ठाकरे,धनंजय पाटील, पंजाबराव चव्हाण, लिंबराज सूर्यवंशी,काळबांडे सर वर्षाताई माने,मोरजकर ताई, ज्योतीताई जाधव इत्यादी मान्यवर हजर राहणार आहेत. तरी मराठा सेवा संघ व ३३ कक्षांच्या आजीवन सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष अशोक ठाकरे, जिल्हाध्यक्ष धनंजय शेंडगे (प), नागनाथ जाधव (पूर्व) कार्याध्यक्ष ज.रा.शिंदे , सचिव प्रा.पंजाबराव येडे यांनी केले आहे.
Back to top button