बीड
भैय्यासाहेब आंबेडकरांना शालेय साहित्य वाटप करून अभिवादन…

भैय्यासाहेब आंबेडकरांना शालेय साहित्य वाटप करून अभिवादन…
( महामानव अभिवादन ग्रुपचा उपक्रम तर ” वाचाल तर वाचाल” वाचनालया तर्फे 46 पुस्तकांची उपलब्धता )
बीड (प्रतिनिधी) – भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाणदिनी मिळालेले शालेय साहित्य वही पेन दानातून इंदिरानगर कॅनल रोड बीड येथे भीमपुत्र यशवंतराव भीमराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या 113 व्या जयंतीदिनी 58 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. तर वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाच्या 9 व्या केंद्रात सातव्या फेरीतील 46 पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांना वाचनाकरता मान्यवरांच्या हस्ते जयश्री साळवे यांना सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक (एल.आय.सी.) यु.एस.वाघमारे अध्यक्षपदी लाभले होते तर मुख्याध्यापक वैशाली शिंदे- उजगरे प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. सर्वप्रथम तथागताना पुष्प, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले,कॅप्टन राजाभाऊ आठवले व वाचनालयाचे अध्यक्ष डि. जी. वानखेडे, यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. तेजस वडमारे यांनी केले तर प्रस्ताविक के.एस.वाघमारे यांनी केले. कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी भारतीय संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन घेतले. प्रमुख पाहुण्या वैशाली शिंदे यानी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून भैय्यासाहेब आंबेडकरांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्म प्रसार व प्रचार व राजकीय कार्यात केलेल्या बहुमोल कार्याबद्दल माहिती दिली. पुस्तक वितरण प्रसंगी या संचातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग घेऊन आपल्या ज्ञानात भर घालावी व वाचन संस्कृतीचे जतन करावे असे नम्र आवाहन केले. कु.स्वराली जावळे ह्या विद्यार्थिनीने भैय्या साहेबांच्या जीवनावर उत्कृष्ट भाषण दिले. त्याबद्दल तिचे वाचनालया तर्फे वही पेन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी मुलांशी हितगुज साधून शिक्षणाबद्दल मोलाचा उपदेश केला.
अध्यक्षीय समारोपात वाघमारे यू.एस.यांनी सांगितले की भैय्यासाहेब आंबेडकर यांनी महु ते मुंबई (दादर) पदयात्रा काढून चैत्यभूमीची निर्मिती केली. तसेच भारतीय बौद्ध महासभेद्वारे बौद्धाचार्य प्रशिक्षणाची यशस्वी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयश्री साळवे यांनी व्याक्त केले. कार्यक्रमास सुनिता गायकवाड, शितल जावळे, कोमल ससाने, सुषमा वीर, नानी बोराडे बहुसंख्या महीला व पुरुषांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना संबोधी सामाजिक प्रतिष्ठांच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी अल्पोपहार दिला. सरणातयने कार्यक्रमाची सांगता झाली.


