बीड

नांदेड येथे आज बसपाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

नांदेड येथे आज बसपाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
 नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड येथे गुरुवार दिनांक ७ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह सभागृहात बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
         महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनिल डोंगरे हे उपस्थित राहणार असून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी मुकुंद सोनवणे (छ. संभाजीनगर), राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे इत्यादींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
        या एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुजन समाज बंधू भगिनींनी वेळेवर उपस्थित रहावे व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुभाष भोकरे यांनी केले आहे.
Back to top button