रायगड

तारणे येथे एस टी व कंटेनर भीषण अपघात. जागीच पाच जण ठार .२५जण जखमी

तारणे येथे एस टी व कंटेनर भीषण अपघात. जागीच पाच जण ठार .२५जण जखमी

विशेष प्रतिनिधी : नंदकुमार चांदोरकर

रहाटाड तळा एस् टी बसला तळा तालुक्यातील तारणे येथील अवघड वळणावर कंटेनर व एस टी बस क्र.एम् एच -२०-३९१४ ही वळणावर कंटेनर ने जोरदार धडक देऊन पुढे जाऊन पलटी झाला.सदर अपघात दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडला या अपघातात जागीच पाच जण मृत पावले हि प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे असून गंभीररित्या जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालय व अंती गंभीर रुग्णांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे इतका गंभीर अपघात झाला आहे. तालुक्यातील सर्वात गंभीर अपघात घडल्याची पहिलीच घटना आहे अपघाताचे वृत समजताच स्थानिक ग्रामस्थ व शहरातील युवा सेना मदतीसाठी धावून गाडीतून प्रवाशांना बाहेर काढले तर काहींना रुग्णालयात दाखल केले.या अपघातात तृप्ती खुटीकर, विठ्ठल कजबळे, लक्ष्मण ढेबे,अनन्या गवाणे व सात वर्षांच्या मुलीचा समावेशआहे.मृतांमध्ये खांबवली,रहाटाड,रहाटाडवाडी, धनगर वाडी येथील प्रवाशांचा समावेशआहे.जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.एस्टीत जवळपास ४५चे वर प्रवासी होते.बस चालक सचीन बोरकर यांने प्रसंगावधान राखून पुढील होणाऱ्या गंभीर अनर्थ टाळला त्यामुळे इतर प्रवाशी बालंबाल वाचले अपघाताची तीव्रता भयानक होती. कंटेनर चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे अपघाताची बातमी समजताच विभागीय पोलीस अधिकारी माणगांव पुष्कराज सुर्यवंशी,पोलीस निरीक्षक संदीप बोऱ्हाडे अपघाताची पहाणी केली तळा सहा.पोलीस निरीक्षक सतीशगवई, एपी आय पाटील, विष्णू तिडके,पौर्णिमा साळुंके सहकारी यांनी मदतकार्य सुरू केले.पुढील तपास विभागीय पोलीस अधीकारी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली सतीश गवई करीत आहेत.

Back to top button