बीड

1 मे च्या कामगार कर्मचारी शेतकरी मिरवणुकीत सहभागी व्हा – प्रा. सुशीलाताई मोराळे

1 मे च्या कामगार कर्मचारी शेतकरी मिरवणुकीत सहभागी व्हा – प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड प्रतिनिधी:- दिवसेंदिवस कामगार कर्मचारी शिक्षक शेतकरी वंचित उपेक्षित वर्गाचे प्रश्न जटिल होत आहेत गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यात २५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत शिक्षण क्षेत्रात रोज नवा जीआर काढून राज्यकर्त्यांनी गोंधळ निर्माण केला आहे. शेतकरी कर्ज माफ करतो म्हणून खोटी आश्वासने देऊन सरकार राज्यात आले मात्र आता शेतकरी कर्ज माफ करता येणार नाही असे जाहीर करून टाकले. लाडकी बहीण योजना गुंडाळण्याची तयारी सुरू आहे जवळपास दहा लाख लाडक्या बहिणींना या ना त्या कारणामुळे लाभ नाकारला आहे कामगार म्हणून मान्यता मिळण्यासाठी ग्रामसेवकांचा दाखला मिळत नाही.52000 शिपाई प्रवर्गाची पदे व्यापगत केली आहेत. नौकऱ्यांचे कंत्राटीकरण सुरू आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सरकार टाळा-टाळ करत आहे. संघटित शक्ती दाखवून सरकारला वटणीवर आणण्यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी शेतकरी कष्टकऱ्यांनी दिनांक १ मे जागतिक कामगार दिनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आव्हान किसान संघर्ष समितीच्या प्रा सुशिलाताई मोराळे यांनी केले आहे. सरकारने जन सुरक्षा कायदा पारित केला आहे हा कायदा लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणार आहे या कायद्याचा फटका पत्रकारांनाही बसणार आहे. एक एप्रिल 2025 पर्यंत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने हरकती मागवल्या होत्या 29 हजार व्यक्ती व संस्थांनी पक्षांनी या हरकती दिल्या आहेत शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यात तफावत आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. भांडवलदारांचे लाखो कोटी रुपये कर्ज सरकारने माफ केले मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे.
लोकशाहीचा पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे परंतु त्यांच्या स्वातंत्र्यावरही दिवसेंदिवस बंधने येत आहेत. शिक्षकांना अनावश्यक कामात गुंतवून त्यांना ताणतणावात ठेवले जात आहे. कामगारांसाठी कल्याणकारी कायदे केल्याचा देखावा निर्माण केला जात आहे मात्र त्यांना कामगार म्हणून प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकांना प्रतिबंधित केले जात आहे. संघटितपणे सरकारवर दबाव आणल्याशिवाय आपले प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी शेतकरी शिक्षक यांनी एकत्र येऊन या मिरवणुकीची शोभा वाढवावी सायंकाळी चार वाजता या मिरवणुकीत महात्मा फुले पुतळ्यापासून सामील व्हावे असे आव्हान किसान संघर्ष समितीच्या सुशिलाताई मोराळे टीचर्स डेमोक्रेटिक फेडरेशन, अखिल भारतीय अध्यापक सभा, आझाद जय हिंद कामगार संघटनेचे फिरोज पठाण, महाराष्ट्र मजूर फेडरेशनचे अमर शेख, शिक्षक समन्वय संघाचे दत्ताभाऊ चव्हाण, ओबीसी चे नेते माजी नगरसेवक खुशीद आलम, संस्था महासंघाचे सरचिटणीस उत्तमराव पवार उपाध्यक्ष सर्जेराव काळे सर, डीपीआयचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोणके, क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे शाहिद कादरीसह ऊसतोड कामगार संघटनेचे नेते संतोष काळे सह मान्यवरांनी केले आहे.
Back to top button