बीड

बीडकरांच्या घशाला कोरड तरी नगरपालिका प्रशासनाला फुटेना पाझर

बीडकरांच्या घशाला कोरड तरी नगरपालिका प्रशासनाला फुटेना पाझर
भर उन्हाळ्यात महिनाभरापासून शहराला पाणीपुरवठा नाही शिवसंग्रामचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा नगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन – सुहास पाटील
 शहराच्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण करणे हे नगर पालिकेचे कर्तव्य असते परंतु बीड नगरपालिकेत मात्र उलट होताना दिसत आहे. मागील काळात सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून बीड शहरातील नागरिकांच्या शहरीकरणाच्या सुविधाबाबत सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. आणि आता प्रशासक देखील दुर्लक्ष करत आहे. गेले एक महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात बीड शहरात पाणी पुरवठा केला जात नाही.  त्यामुळे बीडकारांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे बीडकारांच्या घशाला अक्षरशः कोरड पडली असून देखील नगरपालिका प्रशासनाला पाजार फुटत नाही. त्यामुळे आज बीड शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
   गेल्या अनेक वर्षापासून बीड शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळणे नाही. अँड उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढलेली असताना देखील नगरपालिका प्रशासन बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असमर्थ ठरली आहे गेली अनेक वर्षापासून बीड शहराला पंधरा दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असतानाच पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली बीड शहराला एक महिन्यापासून वेठीस धरणाचे काम नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बीड शहरामध्ये पावणे दोनशे कोटी रुपये खर्च करून अमृत अटल पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली त्या योजनेचा देखील नगरपालिकेने बोजवारा उडवला आहे. या योजनेचे काम झाले असून देखील बीडकारांना आजतागायत तीन दिवसाआड पाणी मिळत नाही. योजनेसाठी कोठावधी रुपये खर्च करून देखील नागरिकांना वन वन फिरण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर शहरातील मोकाट कुत्रे व बेवारस जनावरें ,घाणीच्या साम्राज्यात, रस्त्याची दुरवस्था, मान्सून पूर्व स्वच्छता नकरणे, विद्युत पोल वरील लाईट दुरुस्त करणे कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्यांची सोय करणे यासारख्या अनेक समस्यांनी नागरिक त्रासलेले आहेत. या अनुषंगाने शिवसंग्रामने वारंवार शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात यासाठी पाठपुरावा केलेला आहे. परंतु अजूनही नगरपालिका प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे आज बीड शहर शिवसंग्राम च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत जिल्हा प्रशासनाकडून याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे अन्यथा वरील सर्व शहरी समस्यांचे निराकरण नझाल्यास शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे पाटील, शहराध्यक्ष सुहास पाटील , मनीषाताई कुपकर, युवा जिल्हाध्यक्ष सुनील कुटे, ज्ञानेश्वर कोकाटे, अशोक लोकरे,शेख आबेद, शेषराव तांबे, हरिश्चंद्र ठोसर गणेश धोंडरे कैलास शेजाळ मुकुंद गोरे, पंडित शेंडगे ,अख्तर पेंटर , महादेव बहिर, कृष्णा भागडे, देविदास मेंगडे,   आदी. उपस्थित होते
Back to top button