मुंबई

“लवकरच साखरपुडा करेन”; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने केले भाष्य

 

मुंबई | अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘उरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजल्यानंतर चित्रपटाच्या यशानंतर विकीचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे सध्या विकी सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.

मात्र त्यांच्या अभिनयाबाबरोबर आणखी एका गोष्टीसाठी तो चांगलंच चर्चेत असल्याचे दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनशीपविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र आता कतरीना बरोबर असलेल्या रिलेशनशिप बद्दल विकीने मौन सोडलं आहे.

“अशा प्रकारच्या बातम्या तुमचीच मित्रमंडळी पसरवतात. परंतु, ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी मी नक्की साखरपुडा करेन आणि ती वेळ लवकरच येईल”, असं विकीने सांगितलं. साखपुड्याची वेळ लवकरच येईल असं म्हणणाऱ्या विकीने नेमका कोणासोबत साखरपुडा करणार हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.

Back to top button