संपादकीय

‘याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह’ वरून गांधी यांनी साधला कंगनावर निशाणा

 

देशाला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने बेताल वक्तव्य केलं आहे. यावरून आता तिच्यावर जोरदार टीका होत आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या समिट २०२१ या कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली आहे की, ‘स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल, तर ते स्वातंत्र असू शकत का? १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र… ही भीक होती, खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं’, असं वादग्रस्त विधान तिने केलं होत आता या विधानावरून भाजपा खासदार वरून गांधी यांनी जोरदार टोला तिला हाणला आहे.

‘कधी महात्मा गांधीजींच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेंसह राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार.. या विचाराला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह,’ असा सवाल भाजपा खासदार वरुण गांधी यांनी केला आहे.

सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं,” असं कंगना ‘टाइम्स नाऊ’च्या समिटमध्ये म्हणाली. कंगनाच्या उत्तरावर निवेदिका नाविका कुमार म्हणाल्या, “म्हणूनच सगळे तुला म्हणतात की तू भगवा आहेस.” त्यावर कंगना म्हणते, “आता या विधानानंतर माझ्यावर आणखी १० केसेस होणार आहेत.” “आता तू दिल्लीतच आहेस”, असं नाविका यांनी म्हटल्यावर कंगनाने प्रत्युत्तर देत म्हटलं, “जायचं तर घरीच आहे ना.” कंगनाच्या या विधानावर उपस्थितांपैकी काहींनी टाळ्यांचा वर्षाव केला.

 

 

Back to top button