बीड

बनसाराेळा येथे 10 लक्ष किमतीच्या शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन

बनसाराेळा येथे 10 लक्ष किमतीच्या शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन

ग्रामीण विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचा आमचा प्रयत्न :-  सचिन मुळूक

बीड (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील बनसारोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन खोली बांधकामासाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते करण्यात आले. मुळूक यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन निधीतून बनसारोळा शाळेला 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना आता नवी शाळा इमारत मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सांगितले.

केज तालुक्यातील बनसारोळा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संबंधी सरपंच अजित गोरे यांनी नवीन इमारती संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्याकडे मागणी केली होती. मुळूक यांनी स्वतःच्या जिल्हा नियोजन निधीतून  शाळा खाेली बांधकामासाठी 10 लाखांचा निधी मंजूर केला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक योगेश नवले, केज तालुकाप्रमुख अण्णासाहेब पाटील ,विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाने, भागवत दादा गोरे, बनसारोळा सरपंच अजित गोरे, माजी सरपंच युवराज काकडे, उपसरपंच चंद्रकांत धायगुडे, महिला ता.प्र.जयाताई राऊत, उप तालुकाप्रमुख महेंद्र चाटे, विभाग प्रमुख दत्ता काकडे ,महिला उपजिल्हाप्रमुख हरणावळ ताई, युवा सेना शहर प्रमुख आकाश चाळक सह गावातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान बनसारोळाच्या विद्यार्थ्यांना नवीन शाळा इमारत मिळणार असल्याने  ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button