संपादकीय

“इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लज्जास्पद चुका होऊ शकतात – वर्षा गायकवाड

 

देशाला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने बेताल वक्तव्य केलं आहे. यावरून आता तिच्यावर जोरदार टीका होत आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या समिट २०२१ या कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली आहे की, ‘स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल, तर ते स्वातंत्र असू शकत का? १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र… ही भीक होती, खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं’, असं वादग्रस्त विधान तिने केलं होत्या विधावरून आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कंगनाला चांगलेच फटकारले आहे.

‘इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लाजिरवाण्या चुका आणि गैरसमज होऊ शकतात,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, इतिहास हा खूप महत्त्वाचा विषय आहे, सर्व विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी याचा नीट अभ्यास केला पाहिजे. इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लाजिरवाण्या चुका आणि गैरसमज होऊ शकतात,’ असं त्यांनी कंगनाचा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय.

‘टाइम्स नाऊ’च्या समिट २०२१ या कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली आहे की “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं,” असं कंगना ‘टाइम्स नाऊ’च्या समिटमध्ये म्हणाली.

Back to top button