बीड

तुलसी महाविद्यालयात ‘फ्रेशर्स डे’ साजरा ; नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्होषात स्वागत

तुलसी महाविद्यालयात ‘फ्रेशर्स डे’ साजरा ; नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्होषात स्वागत

बीड (प्रतिनिधी): देवगिरी प्रतिष्ठान संचालित तुलसी संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात बीसीएस प्रथम वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर्स डे’ शनिवार, दि. १९ रोजी उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. नितीन काळे, तसेच व्यासपीठावर डॉ. योगिता लांडगे, प्रा. विवेक जोगदंड, डॉ. विकास वाघमारे, प्रा. अंकुश सुर्वे, प्रा. समीर मिर्झा, प्रा. शिल्पा बोराडे, डॉ. गजानन खेत्री, प्रा. स्वाती साबळे, प्रा. मगन ओव्हाळ, प्रा. पल्लवी जगताप, प्रा. प्राची पाठक आदी उपस्थित होते.

प्रा. नितीन काळे यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, फ्रेशर्स डे हा केवळ आनंदाचा दिवस नसून उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. येथे केवळ शिक्षण नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक भान आणि नैतिक मूल्यांची जडणघडणही तितकीच महत्त्वाची आहे, असे नमूद केले. प्राचार्य प्रा. डी. जी. निकाळजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, महाविद्यालयीन जीवनाचा सकारात्मक उपयोग करून, स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि चिकाटीने प्रयत्न करत यशाकडे वाटचाल करा, असा प्रेरणादायी संदेश दिला. डॉ. विकास वाघमारे आणि डॉ. योगिता लांडगे यांनीही विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात संधी ओळखून त्याचा सकारात्मक उपयोग करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे द्वितीय व तृतीय वर्षाच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मनमोकळ्या वातावरणात स्वागत केले. ‘वेलकम फिएस्टा २ के२५’ या संकल्पनेखाली विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करत संपूर्ण सभागृह भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य ठोंबरे व सपना लोणके यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत हराळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button