📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राजारामबापू साखर कारखान्याचा पॉवरलिप्टर मनिष विजय यादव याची उरण (मुबई) येथील राज्यस्तरीय पॉवर लिप्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई

राजारामबापू साखर कारखान्याचा पॉवरलिप्टर मनिष विजय यादव याची उरण (मुबई) येथील राज्यस्तरीय पॉवर लिप्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई

*इस्लामपूर दि. (प्रतिनिधी):-राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा पॉवरलिप्टर मनिष विजय यादव (बनेवाडी) याने उरण (मुबई) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिप्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांचे मनिष यादव यास प्रोत्साहन व पाठबळ मिळाले आहे.माजी मंत्री आ.जयंतराव पाटील राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून त्यास शुभेच्छा दिल्या.
    अँम्युचेअर पॉवर लिप्टिंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेने उरण (मुंबई) येथे राज्यस्तरीय पॉवर लिप्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मनिष यादव याने १०५ किलो गटात बेंच प्रेस व पॉवर लिप्टिंग प्रकारात पदकांची कमाई केली आहे. तो राजारामबापू पाटील इनडोअर स्टेडियम मधील व्यायाम शाळेत सराव करीत आहे. त्यास हर्षद बारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तो सध्या इस्लामपूर येथील विद्यामंदीर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे. त्याने यापूर्वीही अनेक स्पर्धेत पदक पटकाविले आहेत.
Back to top button