ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

परळीत रक्तदान, बोधिवृक्ष व वृक्षारोपणाने जनसेवेचा आरंभ
या सामाजिक सेवा सप्ताहात रक्तदान शिबिरास ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, तो खरोखरच अभिमानास्पद आहे. रक्तदान हे एक महान दान असून, आपल्या छोट्याशा कृतीने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, यापेक्षा मोठे पुण्यकार्य नाही. परळीकरांचा हा उत्स्फूर्त सहभाग म्हणजे ना.पंकजाताईंच्या कार्यप्रेरणेप्रती असलेली निष्ठा दर्शवतो. तरुणांनी आणि युवक ज्या प्रमाणात सहभागी होऊन सेवा केली, ते पाहून खूप समाधान वाटते असे प्रतिपादन उमाताई समशेट्टी यांनी यावेळी बोलताना केले. रक्तदान शिबिरात परळी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. शहरातील विविध भागांतून आलेल्या युवकांनी, महिलांनी आणि ज्येष्ठांनी ‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून स्वतःहून रक्तदान करत एक सामाजिक संदेश दिला. यावेळी रक्तदात्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
भीमवाडीमध्ये बोधिवृक्ष रोपण – बौद्ध संस्कृतीचा शांतीदायक संदेश
या सामाजिक उपक्रमांतर्गत परळी शहरातील भीमवाडी येथील बौध्द विहारामध्ये बोधिवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. बोधिवृक्ष हे बौद्ध संस्कृतीत प्रबोधन, आत्मज्ञान व शांतीचे प्रतीक मानले जाते. या वृक्षारोपणाद्वारे लोकांमध्ये पर्यावरण जतनाचा व जागरूकतेचा संदेश पोहोचविण्यात आला.
हनुमान नगरात वृक्षारोपण
हनुमान नगर परिसरात विविध देशी व स्थानिक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थी, भाजपाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी झाडे लावत ‘हरित परळी, स्वच्छ परळी’चा संकल्प केला.
संजय गांधी निराधार योजना – DBT सामाजिक उपक्रमास प्रचंड प्रतिसाद
संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी आधार व थेट लाभ हस्तांतरण (DBT) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यास जनतेकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात नवीन लाभार्थ्यांची नोंदणी, आधार लिंकिंग, बँक खाते तपासणी, आणि DBT सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. निराधार, विधवा, अपंग, ज्येष्ठ नागरिक, आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील शेकडो लाभार्थ्यांनी उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेत आहेत.
या सर्व सामाजिक उपक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे, भाजप तालुकाध्यक्ष राजेश गित्ते, वसंतराव निर्मळ, शहराध्यक्षा उमाताई समशेट्टी, डॉ. शालिनी कराड, दै.जगमिञचे संपादक बाळासाहेब कडबाने, पञकार प्रविण फुटके, पवन मुंडे, राजेंद्र ओझा, उमेश खाडे, महादेव ईटके, ॲङ अरुण पाठक, स्वीय सहायक पी.के.बडे, अच्युत जोगदंड, सचिन गित्ते, किशोर केंद्रे, सुनिल चिकाटे, राहुल घोबाळे, यशपाल मुंडे, अनिश अग्रवाल, चंद्रकांत देवकते, श्रीनिवास राऊत, योगेश पांडकर नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, बाळु फुले, जितेंद्र मस्के, प्रितेश कराड, बाळु फुले, मोहन जोशी, प्रितेश तोतला, बंडुनाना कोरे, सुशिल हरंगुळे, सारीका कुरील, चंदाताई ठोंबरे, उमेश निळे, आश्विन मोगरकर, बालासाहेब घोबाळे, योगेश पांडकर, श्रीपाद शिंदे, विजय बुंदेले, योगेश मुंडे, विराज गित्ते, निलेश गित्ते, सुदर्शन गित्ते, पञकार सुरवसे, कृष्णा बेदरकर, दिलीप नेहरकर, सुदर्शन वडकर, गोविंद चौरे, यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



