उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात युवासेनेच्या 11 शाखांचा शुभारंभ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात युवासेनेच्या 11 शाखांचा शुभारंभ
युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद वाढली
बीड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवासेना सचिव (महाराष्ट्र) किरण साळी तसेच युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात युवासेनेच्या 11 शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन झालेल्या शाखांमध्ये राजपिंपरी, वाघदरातांडा, महादेव तांडा, देवपिंपरी, भाट अंतरवाली फाटा, आहेर वस्ती, खळेगाव फाटा, ब्रह्मगाव, ब्रह्मगाव फाटा, चव्हाणवाडी व माटेगाव या गावांचा समावेश असून ही सर्व गावे तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजक युवासेना तालुका प्रमुख बबन (आप्पा) मोघे होते. उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थिती मराठवाडा निरीक्षक श्री.अविनाश भाऊ जाधव व
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत (आप्पा) नवले व युवा सेना जिल्हाप्रमुख अजय भैय्या सुरवसे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुमित भैया कोळपे युवा सेना तालुकाप्रमुख बबन आप्पा मोघे शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण राव शिंदे शिवसेना शहरप्रमुख मुकेश अण्णा महाजन शिवसेना ज्येष्ठ नेते लिंबाजी मामा जाधव शिवसेना जिल्हा संघटक विक्रम भोसले शिवसेना विधानसभा प्रमुख नवनाथ गवते युवासेना विधानसभा प्रमुख उमेश शिंदे युवा सेना शहरप्रमुख गणेश पवार युवा सेना धोंडराई सर्कल प्रमुख अंकुशराव मोरे युवा नेते पिंटू भैया पानखडे गणेशराव चव्हाण विठ्ठलराव पवार तात्यासाहेब चव्हाण सर्व शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, युवा सेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते धोंडराई सर्कल मधल्या या गावांमध्ये, राजप्रिंप्री, महादेव तांडा, माटेगाव, देवप्रिंप्री, ब्रह्मगाव, भट अतंरवाली, वाघदरा तांडा, खळेगाव, आहेर वस्ती, चव्हाणवाडी अशा अनेक गावांमध्ये शाखांचे उद्घाटन पार पडले. यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, शाखाप्रमुख, पदाधिकारी, गावातील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषणात चंद्रकांत आप्पा नवले यांनी शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना आणि वारकरी संप्रदाय हे आपल्या कुटुंबाचा भाग असल्याचे सांगून हे संघटनात्मक कुटुंब अधिक व्यापक कसे करता येईल यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले. या नव्या शाखांमुळे गेवराई तालुक्यात युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याची भावना पदाधिकार्यांनी व्यक्त केली.



