📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मोहाडी पोलिसांकडून अवैध दारू अड्ड्यावर धाड: अडीच लाखांहून अधिक किमतीचा सडवा मोहफूल जप्त.

मोहाडी पोलिसांकडून अवैध दारू अड्ड्यावर धाड: अडीच लाखांहून अधिक किमतीचा सडवा मोहफूल जप्त.
*दै, सूर्योदय*:- मोहाडी:- मोहाडी पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. एका दारू अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुशारी गावात अवैध दारूचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. छापा टाकलेल्या ठिकाणी प्रफुल परसराम बावने (वय ३५) आणि राकेश सुकराम भुरे (वय ३९), दोघेही रा. कुशारी, ता. मोहाडी, जि. भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले.
या छाप्यात, पोलिसांनी निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये असलेला १२०० किलो सडवा मोहफूल जप्त केला, ज्याची अंदाजे किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे. तसेच, दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे १२ प्लास्टिक ड्रम (किंमत ६,००० रुपये) आणि १००० किलो जळाऊ लाकडी काड्या (किंमत १०,००० रुपये) असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध दारू निर्मिती आणि विक्री प्रकरणी, आरोपींविरुद्ध मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. २०२/२०२५ कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दूधकावरा पोलीस हवालदार मुकेश भोंगाडे (ब.नं./८५०) आणि पोलीस शिपाई कुंभलकर (ब.नं./५०१) यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
Back to top button