बीड
अखेर २ वर्षांपासून घराची पडझड झाल्याने महिला बचतगट भवनामध्ये राहणा-या निराधार सरस्वती शिंदेना घरकुल मिळाले ; लिंबागणेश ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजुरी पत्र वाटप :- डॉ.गणेश ढवळे

अखेर २ वर्षांपासून घराची पडझड झाल्याने महिला बचतगट भवनामध्ये राहणा-या निराधार सरस्वती शिंदेना घरकुल मिळाले ; लिंबागणेश ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजुरी पत्र वाटप :- डॉ.गणेश ढवळे
—
लिंबागणेश:- ( दि.२३ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात काल दि.२२ शनिवार रोजी सरपंच बालासाहेब जाधव, ग्रामविकास अधिकारी वीर,सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, बाळकृष्ण थोरात, दादा गायकवाड, श्रीहरी निर्मळ यांच्या उपस्थितीत गावातील एकुण १५७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.आपल्या हक्काचे घर असावे,हक्काचा निवारा, घरकुल मिळवून देण्याचे काम प्रधानमंत्री आवास योजनेमुळे लाभार्थीचे घराचे स्वप्न साकार होणार असल्याने लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
पडझड झालेल्या घरामुळे २ वर्षांपासून महिला बचत गट भवनात राहणाऱ्या निराधार सरस्वती शिंदेंना हक्काचा निवारा मिळणार
—
लिंबागणेश येथील सरस्वती माणिक शिंदे वय ६० वर्षे यांच्या पतीचे निधन ३० वर्षांपूर्वी झाले. मोलमजुरी करून मुलीचे पालनपोषण करून लग्न लावून दिले. २ वर्षांपूर्वी राहते मातीचे घर जमिनदोस्त झाले. त्यानंतर महिला बचतगट भवनात संसार थाटला.२ वर्षांपासून भवनात राहतात.रात्री लाईट नसल्याने १५ दिवसांपूर्वी घुशीने गालाचा चावा घेतला. अखेर काल ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजुरीचे प्रमाणपत्र मिळाले आणि अखेर त्यांच्या निवा-याचा प्रश्न सुटणार असल्याने चेह-यावर समाधान दिसून आले.
घरकुल लाभार्थ्यांकडुन एकही रुपया न घेता कागदपत्रे सुद्धा सरपंचांनी स्वखर्चाने बनवली हे कौतुकास्पद :- डॉ.गणेश ढवळे
—-
घरकुल मंजुरी बाबतीत लाभार्थ्यांकडुन अवाजवी पैसे घेतल्याची ओरड एकीकडे होत असताना लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव, दादासाहेब गायकवाड व बाळकृष्ण थोरात यांनी लाभार्थ्यांकडुन एकही रुपया न घेता शासन दरबारी फायली फिरवत स्वखर्चाने कागदपत्रे सुद्धा बनवली हि बाब कौतुकास्पद असुन याबद्दल ग्रामस्थांनी यांचे आभार मानले.



