संपादकीय

सदाभाऊ आणि पडळकरांनी धरले लोकांना वेठीस, वेळ आल्यावर त्यांनाही बघू

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात घुसल्यामुळे वाद पेटला आहे. सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावले आहे, त्यांनीच लोकांनाही ऐन दिवाळीत वेठीस धरले आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू, असा इशाराच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आजही तोडगा निघाला नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधून पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले आहे. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर येण्याची तयारी कर्मचारी दाखवत आहेत. त्यांना संरक्षणाची हमी दिली आहे. विलिनीकरण्याच्या मागणीबाबत त्यांनी समितीसमोर जावं. कामगारांनी कामावर जावे. राजकीय पक्ष पोळी भाजून बाहेर जातील पण नुकसान तुमचे होईल असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन परब यांनी केलं. तसेच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही संप भडकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एसटी आणखी खड्ड्यात जाईल, असे वागू नका पगारवाढी संदर्भातील बोलणी सुरू होतील, तेव्हा पगार वाढवण्यासंदर्भात बोलावे, सदाभाऊ खोत आंदोलन भरकटवू नका. त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांनीही विचार करावा की त्यांचे यात नुकसान आहे, असंही परब म्हणाले.

Back to top button