जामखेड येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३९ वी पुण्यतिथी साजरी

जामखेड येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३९ वी पुण्यतिथी साजरी
जामखेड प्रतिनिधी;-सालाबादाप्रमाणे या वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज युवा मंच, जामखेड सराफ व सुवर्णकार असोशिएसन तालुका सोनार समाज यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३९ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पवृष्टी व गुलालाची उधळ्ण करत सकाळी १०.०० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून भजन करत टाळ, मृदूंग व पखवाज च्या गजरात हरिनामाचा गजर करत छत्रपती शिवाजी महाराज पेठ,जयहिंद चौक, बिड रोड कॉर्नर, तहसिल रोड, कोर्ट रोड,सोनार गल्ली,गढी,महादेव गल्ली पर्यंत प्रतिमा मिरवणुक काढण्यात आली. “श्री संत शिरोमणी नरहरी महाराज की जय घोषात ‘ जामखेड शहर दूमदुमुन गेले.यामध्ये जेष्ठ मंडळी , पुरुष, महिला व तरुण मोठ्या संख्येने मिरणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकी नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ह.भ.प. मंजरतकर महाराज यांचे किर्तन व महाप्रसाद किर्तन झाले.



