जामखेड दणाणलं! नृत्यांगनेचा रहस्यमय मृत्यू—साई लॉजच्या रुममध्ये नेमकं घडलं तरी काय?

जामखेड दणाणलं! नृत्यांगनेचा रहस्यमय मृत्यू—साई लॉजच्या रुममध्ये नेमकं घडलं तरी काय?
जामखेड प्रतिनिधी:
तपनेश्वर भागातील नागरिकांना हादरवणारी घटना! गुरुवारी सकाळी नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील (वय ३५) हिचा मृतदेह खर्डा रोडवरील साई लॉजच्या रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मूळ कल्याणची असलेली दिपाली जामखेडमधील कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती व काही मैत्रिणींंसह भाड्याच्या घरात राहत होती.
सकाळी “बाजारात जाऊन येते” एवढेच सांगून बाहेर पडलेल्या दिपालीचा बराच वेळ उलटूनही पत्ता न लागल्याने मैत्रिणींमध्ये चिंता वाढली. फोन बंद येत असल्याने संशय गडद झाला. अखेर तिला सोडणाऱ्या रिक्शाचालकाकडे विचारणा केली असता, त्याने तिला साई लॉज येथे उतरवल्याचे सांगितले.
सायंकाळी साडेपाचला मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या. रुम आतून लॉक असल्याने वेटरची मदत घेऊन डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्यात आला आणि आतल्या दृश्याने सगळ्यांचा श्वास रोखला.दिपाली छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत! पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आत्महत्या की काही वेगळं? अद्याप स्पष्ट नाही. मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे यांच्या तक्रारीवरून प्रकरण नोंदवण्यात आले आहे.
स्थानिकांचा सवाल!हा मृत्यू की काहीतरी वेगळा खेळ?
घटनेनंतर जामखेड शहरात चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम पसरला आहे. अनेक नागरिकांचे मत आहे की,जामखेडमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध लॉजिंगमुळे अशा घटना घडण्याची भीती वाढली आहे. अशा ठिकाणांवरील निर्बंधित कार्यवाही याबाबत नागरिकांनी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे
. या मृत्यूची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यायला हवे.स्थानिक प्रशासन आणि पोलिसांसमोर हे प्रकरण एक गंभीर आव्हान ठरत आहे.



