बीड
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे यांची निवडणूक महिलांनी घेतली हाती

अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे यांची निवडणूक महिलांनी घेतली हाती
बीड ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार प्रेमलताताई पारवे यांच्यासह प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक पदाच्या उमेदवार लताबाई धोंडीराम हातागळे आणि वैष्णवी रामसिंग टाक यांच्या प्रचारार्थ महिलांनी पेठ बीड भागात रॅली काढून डोअर टू डोअर मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. महिलांनी स्वतः प्रेमलताताई पारवे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची निवडणूक हाती घेतली आहे.
बीड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना , शिवसंग्राम मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक पदाच्या उमेदवार लताबाई धोंडीराम हातागळे आणि वैष्णवी रामसिंग टाक यांना सोबत घेऊन पेठ बीड परिसर पिंजून काढला. रविवारी सकाळपासूनच पेठ बीड भागातील रमाई कॉलनी, दुबे कॉलनी, साईनगर, खंडेश्वरी परिसर, पूरग्रस्त कॉलनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर या भागात डोअर टू डोअर जाऊन महिला भगिनींशी संवाद साधला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बीड शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. विकासाची दूरदृष्टी ठेवून वाटचाल करत असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला मतरुपी बळ देऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले. प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. महिलांनी स्वतः प्रेमलताताई पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची निवडणूक हाती घेत विजयी करण्याचा निर्धार केला आहे.


