औरंगाबाद

“आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरू आहे, मुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंह यांना टोला

 

औरंगाबाद | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लगावत एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यातच त्यांनी देशमुख विरोधात लेटर बॉम्ब टाकत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या या लेटरबॉम्बनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते.

याच प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच अनिल देशमुख यांच्या घरावर इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयकडून धाडसत्र सुरू आहे. मात्र, असे असतानाच तक्रारदार असलेले परमबीर सिंग हेच गायब आहेत. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता परमबीर सिंह यांना टोला लगावला आहे.

आरोप करणाराच पळून गेला आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, तरीपण केस सुरू आहे. तक्रारदार गायब.. आरोप करुन पळून गेला, कुठे गेला कोणाला माहिती नाही. पण आरोप केले आहेत ना मग खणून काढा. खणलं जात आहे. चौकश्या सुरू आहेत. धाडसत्र सुरू आहेत असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या नावाचा उल्लेख टाळत टीका केली आहे.

Back to top button