संपादकीय

महाराष्ट्रात मार्चपर्यंत भाजपचे सरकार स्थापन होईल नारायण राणेंचा दावा!

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात तसेच राणे कुटुंबीय सतत सरकार पडण्याच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करताना दिसून येत आहे. त्यातच आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडण्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. आता त्यांच्या या विधानामुळे आणि नव्या तारखांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या कॅचर्चेला उधाण आले आहे

मार्चपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि येथे भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे सरकार आल्यास अपेक्षित बदल दिसेल असे ते म्हणाले. दरम्यान ते म्हणाले की, ही गोष्ट माझ्या आत आहे, त्यामुळे मला ती आता बाहेर काढायची नाही. सरकार बनवायचे असेल किंवा सरकार पाडायचे असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात.

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत ते म्हणाले की, त्यांनी मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन करण्याचे बोलले आहे आणि ते खरे करून दाखवण्याचे काम आम्ही करू. त्याचवेळी ते उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले की, त्यांची तब्येत खराब आहे, त्यामुळे मला भाष्य करायचे नाही, मात्र युतीचे सरकार फार काळ टिकणार नाही. असं नारायण राणे म्हणाले आहेत.

Back to top button