बीड

अंबाजोगाई त चोरांचा सुळसुळाट

अंबाजोगाई त चोरांचा सुळसुळाट

अंबाजोगाई प्रतिनिधी;- .:अंबाजोगाई शहरात व परीसरात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाल्याने नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण आहे.गेल्या आठवड्यात राधा नगरी मध्ये दोन ते तिन वेळेस चोर येऊन गेले .

अंबाजोगाई बस स्थानक मध्ये लग्न समारंभ आटोपून गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील बसस्थानकात रविवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

सोनपेठ येथील गुलाबशहा राणी गयासोद्दीन मन्यार या पतीसह परंडा येथे एका लग्न समारंभाला गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या पंढरपूर-अंबाजोगाई बसने अंबाजोगाईतील नगरपालिकेच्या उद्यानासमोरील तात्पुरत्या बसस्थानकात आल्या. त्यानंतर माजलगाव गाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सवर डल्ला मारला. या पर्समध्ये आठ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने खाली उतरून परिसरात शोध घेतला, मात्र चोरटा पसार झाला होता. यानंतर त्यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून गुन्हा नोंद झाला आहे.
*पिताजी सारडा नगरीत चोरांचा सुळसुळाट*
पिताजी सारडा नगरी रविवारी रात्री 2ते 3 वाजताच्या वेळेस अंदाजे पाच ते सात चोरांची टोळी घुसली व नगरी मध्ये कांही लोकांच्या सावधगिरी मुळे चोरीचा डाव फसला .तसेच अंबाजोगाई शहर व परीसरात पुन्हा पहिल्या सारखी गस्त घालण्याची वेळ आली आहे .सारडा नगरीत प्रत्यक्षात चोर फिरताना CCTV फुटेज मध्ये दिसत आहेत. त्यामुळे नगरीमध्ये गस्त किंवा वाचमन चे नियोजन करावे व बिल्डर्स ने नगरीच्या सुरक्षेच्या द्रुष्टीने राहिले ले कामे पुर्ण करुन दयावेत. गेट बसविण्यात यावेत ,असा नागरीकातुन सुर निघत आहे.

*अंबाजोगाईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ*
गेल्या काही काळात अंबाजोगाईत चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बंद घरे फोडणे, चेन स्नॅचिंग, पर्स चोरी यांसारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. चोऱ्या नियंत्रणात येत नसल्याने पोलीस यंत्रणेवर नाराजीचा सूर उमटत आहे.

Back to top button