📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रत्नागिरी

खेड जेसीआय तर्फे समाजसेवा गौरव पुरस्काराने उद्योजक श्री.रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण सन्मानीत…

खेड जेसीआय तर्फे समाजसेवा गौरव पुरस्काराने उद्योजक श्री.रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण सन्मानीत…

शनिवार दिनांक १३/०९/२०२५ रोजी खेडमधील स्वर्गीय मिनाताई ठाकरे नाट्यगृहात पार पडलेल्या जेसीआयच्या दिमाखादार पुरस्कार वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध उद्योजक श्री रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजसेवा गौरव २०२५ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री.रमेश चव्हाण यांना या पुरस्काराचे वितरण जेसीआयचे विभागीय अध्यक्ष श्री.शाबा गवंस व खेड जेसीचे अध्यक्ष श्री.अमर दळवी यांच्याहस्ते करण्यात आले.
श्री‌.रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
तसेच बावा शेठ मित्रमंडळाच्या श्री.अनिल सदरे,श्री.अनिल ,मोरे,श्री.प्रभाकर कोळेकर,श्री.समीर सावंत,श्री.गणेश भोसले,श्री.विनय माळी,श्री.प्रविण छपरे,श्री.रमेश वंडकर,श्री.संदीप म्हसकर,श्री.रविंद्र प्रभू व श्री.वसंत पवार इत्यादी सदस्यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Back to top button