बीड

लक्ष्मण हाके यांनी आपल्या कुटुंबातील मुलगी माझ्या कुटुंबातील मुलांना द्यावी – ॲड. गणेश मोरे 

लक्ष्मण हाके यांनी आपल्या कुटुंबातील मुलगी माझ्या कुटुंबातील मुलांना द्यावी – ॲड. गणेश मोरे

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक ॲड. गणेश मोरे यांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल थेट लक्ष्मण हाके यांनाच आवाहन केले आहे. लक्ष्मण हाके यांनी आपल्या कुटुंबातील मुलगी आमच्या कुटुंबातील मुलांना द्यावी. माझ्या कुटुंबातील माझा भाऊ माझे पुतणे तसेच माझे नातेवाईक हे उच्चशिक्षित असून आम्ही सक्षम आहोत. वडिलोपार्जित शेकडो एकर जमीन सुद्धा आम्हाला आहे. माझा भाऊ तसेच माझा पुतण्या नोकरदार असून तो सुद्धा अविवाहित असून त्याला लक्ष्मण हाके यांनी त्यांची मुलगी अथवा बहीण द्यावी. आता लक्ष्मण हाके त्यांना गणेश मोरे यांनी आवाहन करत सोयरीकीची मागणी केली आहे. आता आम्ही तर ओबीसी मध्ये गेलो आहोत. मग तुमची मुलगी आमच्या कुटुंबात द्या, तुमची मुलगी आम्ही करण्यास तयार आहोत. आमच्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये सर्व अकरा मुले अविवाहित असून सर्वच उच्चशिक्षित आहेत आणि शेकडो एकर जमीन ही वडीलोपार्जित आहे. त्यासाठी लक्ष्मण हाके यांनी आपल्या कुटुंबातील मुलगी आम्हाला द्यावी. हिंदू धर्मामध्ये आंतरजातीय विवाह परंपरा पहिल्यापासूनच महाराष्ट्रात चालू आहे. परंतु आता आपण तर ओबीसी झालो आहोत. त्यासाठी आता नातेसंबंध करा, राजकारातील स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना आदर्श आणि दैवत मानतो.
राजकारण आणि सामाजिक चळवळीतील माझे आदर्श लोकनेते विनायकराव मेटे साहेब आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे माझे कायम आदर्श आणि दैवत मानत आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये रोटी – बेटी व्यवहाराचा विषय येत असेल तर आपण दिलेल्या आवाहन प्रमाणे आपल्या कुटुंबातील मुलगी ही माझ्या कुटुंबात सुन म्हणुन स्वीकार करतो. पुढील काळामध्ये आमच्या कुटुंबात तुमच्या मुलीला आम्ही मुली प्रमाणे सांभाळू असे आवाहन ॲड. गणेश मोरे यांनी केले आहे.
Back to top button