रत्नागिरी

मंडणगड येथे भाजपाने दाखल केले उमेदवारी अर्ज

मंडणगड येथे भाजपाने दाखल केले उमेदवारी अर्ज


मंडणगड प्रतिनिधी दि. 21- महायुतीत जागा वाटपाचा सन्मान जनक तोडगा न निघाल्याने तालुक्यात शिंदे सेनेशी फारकत घेतलेल्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकरिता आपल्या उमेदवारांचे अर्ज (21) जानेवारी 2026 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे यांच्याकडे दाखल केले. यावेळी भाजपा माजी तालुका अध्यक्ष सचिन थोरे, अप्पासाहेब मोरे, महेश कंचावडे, राजेश नगरकर, विश्वदास लोखंडे, दत्ता महाडीक, आकाश नाविलकर, रविकूमार मिश्रा, वसंत सुतार, प्रल्हाद सुतार, राजेश नगरकर, रामदास भागडे आदी उपस्थित होते. पार्टीचेवतीने स्मिता थोरे, रत्ना मोहीते, रेखा भागडे, वसंत सुतार, सचिन थोरे यांचे अर्ज दाखल करण्यात आले.
नेतृत्वाचे निर्देशानुसार निवडणुकीस सामोरो जाणार असल्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर पत्रकाराना सांगीतले असून निवडणुकीत विजयाचा विश्वस व्यक्त करताना भिंगळोली जि.प.गट, तुळशी व इस्मामपूर गणात आम्ही उमेदवार दाखल केले आहेत पार्टीचे वरिष्ठ स्तरावरुन घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार पुढील मार्गक्रमण करण्यात येईल.

Back to top button