बीड

समाजकारणाचा वारसा जपणाऱ्या सौ. संगीताताई ठोसर यांना नगरपालिका निवडणुकीत संधी द्यावी – नागरिकांची मागणी.

समाजकारणाचा वारसा जपणाऱ्या सौ. संगीताताई ठोसर यांना नगरपालिका निवडणुकीत संधी द्यावी – नागरिकांची मागणी.
*फक्त आश्वासन नाही, कृती : कार्यतत्पर संगीताताई ठोसर यांना पालिका निवडणुकीत उतरवा.*
*​घरोघरी पोहोचलेल्या ‘संगीताताईं’ना संधी द्या; संगीताताई ठोसर यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा शिवसंग्रामकडे आग्रह..*
*​बीड (वार्ताहर) :-* शिवसंग्राम आपल्या दारी या चळवळीतील एक सक्रिय महिला नेतृत्व म्हणून बीड शहर उपाध्यक्षा सौ. संगीताताई ठोसर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये त्या एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून सातत्याने काम करत आहेत. त्यांची ही तळमळ आणि जनसामान्यांसाठीची बांधिलकी पाहता, त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी,अशी या प्रभागातील नागरिकांची अपेक्षा आहे.
        ​प्रभागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असताना, त्यांनी नागरिकांच्या मागणीची वाट न पाहता स्वखर्चाने संपूर्ण खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा दिला होता.लोकनेते मा.आ. विनायकराव मेटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेनगर येथे भर पावसात त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे घेतला. त्यांच्या या कार्याची दखल मोठया प्रमाणात घेण्यात आली होती.मागील काही दिवसांत पोस्टमन कॉलनी येथील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी रांगोळी स्पर्धेचेही आयोजन केले आणि विजेत्या महिलांना बक्षीस व भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. ​शिवसंग्राम आपल्या दारी या अभियानात सक्रिय सहभाग घेत प्रत्येक महिलेच्या घरोघरी भेट देण्यामध्ये संगीताताईंचा हातखंडा आहे. त्यांचे आपुलकीचं बोलणं आणि सर्वांशी ओळख व नातेसंबंध जपण्याची कला यामुळे त्यांना महिलांना जोडण्याचा छंदच जडला आहे.महिलांना रोजगार निर्मितीसाठी ही प्रोत्साहन देण्याचे काम त्या सातत्याने करत असतात.तसेच अडल्या नडल्यांची मदत करणे, विचारपूस करणे व छोटे छोटे प्रश्न मार्गी लावून त्यातून मिळणारा आनंद हाच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने समाजकारण आहे.
​​जेव्हा प्रभाग क्रमांक एकमध्ये घंटागाडी वेळेवर येत नव्हती आणि पाण्याचा टँकर येत नव्हता, तेव्हा त्यांनी स्वतः नगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आणि सतत पाठपुरावा करून या ठिकाणच्या लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या प्रभागामध्ये स्वच्छता राखण्यात देखील संगीताताईंचा मोलाचा वाटा आहे.
​     ​प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांसाठी त्यांनी केलेले समर्पण आणि त्यांचे अथक प्रयत्न पाहता, नागरिकांचे म्हणणे आहे की, सौ.संगीताताई ठोसर या केवळ कागदी कार्यकर्ता नसून प्रत्यक्षात काम करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांच्या या पारदर्शक आणि निस्वार्थ समाजकार्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत त्यांना प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची एक संधी निश्चितपणे द्यावी.
Back to top button