बीड

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या टोळीच्या म्होरक्याचा शोध लावा- सकल मराठासेवकांकडून तीव्र निषेध

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या टोळीच्या म्होरक्याचा शोध लावा- सकल मराठासेवकांकडून तीव्र निषेध

कोळगाव बाळासाहेब घाडगे – मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून राज्यातील मराठा समाजाला सरसकट मराठा ओबीसीतून आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट अंमलबजावणी नंतर मोठं यश आले असताना दुसरीकडे विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र या घटनेचा मादळमोही कोळगाव, बंगाली पिंपळा तांदळा, परिसरातून सकल मराठासेवाकांडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. तरी या षडयंत्र करणाऱ्या टोळीचा म्होरक्या लवकरात लवकर सरकारने आणि पोलिस यंत्रणेकडून शोधा अशी मागणी मराठा सेवक सामाजिक कार्यकर्ते माऊली नवले, संचालक अशोक खरात,अँड कृष्णा लोंढे सर यांनी केली आहे.
     मराठा समाज आरक्षणापासून अनेक वर्षांपासून वंचित आहे. दरम्यान कुणबी मराठा आरक्षणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार ला सळो की पळो करून सोडले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलनाने मराठा आरक्षण संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र पेटला व त्याची धग प्रत्येक गावामध्ये व प्रत्येक कुटूंब व प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचली जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो कुणबी नोंदी निघाल्या असून हैदराबाद सातारा गॅझेट अंमलबजावणी नंतर मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांचा फायदा होत आहे. तर दुसरीकडे राजकारणी विरोधकांनी विरोध न करता खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडे राजकारण केले आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार जालना पोलिसात दाखल करण्यात आली असून या कटाच्या मागचा म्होरक्या कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे.असे कट रचले जात असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. याचा शोध पोलिसांनी तात्काळ घेण्याची गरज आहे. सरकारने आणि पोलिस यंत्रणेकडून शोधा अशी मागणी मराठा सेवक मनोज शेंबडे, सरपंच नवनाथ गवते, तुकाराम तळतकर, अविनाश गवळी पांडुरंग पवार यांनी केली आहे.
Back to top button