बीड

जामखेड तालुक्यातील भटक्या-विमुक्त समुदायातील महिलांसाठी

जामखेड तालुक्यातील भटक्या-विमुक्त समुदायातील महिलांसाठी

जेंडर व प्रजनन आरोग्य हक्कांवर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

जामखेड : पंचायत समिती, जामखेड व ग्रामीण विकास केंद्र, जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील भटक्या-विमुक्त समुदायातील महिला सामाजिक कार्यकर्त्या, एकल महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य कार्यकर्त्यांसाठी जेंडर (लिंगभाव समानता) व महिलांचे प्रजनन आरोग्य हक्क या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जामखेड येथील महावीर मंगलकार्यालयात होणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन श्री. शुभम जाधव यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सत्र सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत पार पडेल. यावेळी डॉ. सुनील बोराडे (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. रवि (दादा) आरोळे (ग्रामीण आरोग्य प्रकल्प) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच रोहिणी येलपणेकर (विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग), हिरा सानप (प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प), मा. उमाताई जाधव (सचिव, ग्रामीण विकास केंद्र) व अ‍ॅड. हर्षल एन. डोके (कायदेशीर सल्लागार, ग्रामीण विकास केंद्र) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या पहिल्या सत्रात जेंडर (लिंगभाव), पितृसत्ता व महिलांचे आरोग्य या विषयावर मा. आनंद पवार (संचालक, सम्यक संवाद व संसाधन केंद्र, पुणे) मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १ ते २ या वेळेत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

दुसरे सत्र दुपारी २ ते ३ या वेळेत होणार असून महिलांचे प्रजनन आरोग्य आणि हक्क या विषयावर प्रितम पोतदार (व्यवस्थापकीय संचालक, सम्यक संवाद व संसाधन केंद्र, पुणे तसेच संशोधक, टाटा इन्स्टिट्यूट, मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ ते ३.३० या वेळेत सहभागी प्रशिक्षणार्थींच्या सहभागातून समारोप व पुढील कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेत जामखेड तालुक्यातील संबंधित महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button