📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता तातडीने पूर्ण करा

जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता तातडीने पूर्ण करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

१० दिवसांत काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

जामखेड ता. 5 :जामखेड तालुक्यातील जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या काही काळापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची संख्या सातत्याने वाढत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे. रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने विकास प्रक्रियेलाही अडथळा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष प्रशांत जालिंदर राळेभात यांच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदार व विभागाला तातडीने आदेश देऊन सदर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले
,शहाजी राळेभात, युवक शहराध्यक्ष तथा नगरसेवक वसिम सय्यद,बाजार समितीचे माजी संचालक सागर सदाफुले,
माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद,युवा नेते कुंडल राळेभात, प्रवक्ते डॉ.कैलास हजारे,नासिर सय्यद,अमोल लोहकरे,माजी सरपंच बापूसाहेब कार्ले,संदीप गायकवाड,सूर्यकांत सदाफुले, अमोल गिरमे, प्रवीण उगले, सागर भोसले, लक्ष्मण गोरे,दादा महाडिक, इम्रान तांबोळी, रविंद्र आष्टेकर,सचिन शिंदे, संदीप साबळे, संदीप अडाले, मनोज राळेभात,बिलाल शेख, मनोज कार्ले, गणेश गायकवाड, दादा शिंदे, गजानन ढवळे उपस्थित होते.

निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, येत्या १० दिवसांच्या आत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास किंवा योग्य कार्यवाही करण्यात आली नाही, तर समस्त जामखेडकर नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. 8या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी व रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button