बीड

खडतर परिश्रम व संस्कार यांच्या जोरावर खरे यश – संतोष रत्नपारखी 

खडतर परिश्रम व संस्कार यांच्या जोरावर खरे यश – संतोष रत्नपारखी
बी.के.शिंदे कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार ; गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
जामखेड,दि.३(प्रतिनिधी) – खडतर परिश्रम व संस्कार यांच्या जोरावरच खरे यश मिळते, असे प्रतिपादन बी.के.शिंदे ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात संतोष रत्नपारखी यांनी केले.
   जामखेड शहरातील श्रीनाथ एज्युकेशन फाउंडेशन संचलित बी.के.शिंदे कॉलेजमध्ये जेईई, नीट, एमएचटी-सीईटी व एमपीएससी सरळसेवा भरतीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
      कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष रत्नपारखी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बाळासाहेब शिंदे,डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक,डॉ.गणेश बारगजे, ॲड.नितीन राजपुरे, वैभव दस्तुरे,अभिजीत वारे, विजय भालेराव,वैभव दस्तुरे,विष्णू गंभीरे,युवा नेते प्रवीण बोलभट,गणेश हगवणे,धनराज पवार आदी मान्यवर,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये शासकीय सेवेत सिमा सानप (महसूल सहाय्यक), किरण आढाव (महसूल सेवक) यांच्यासह त्याचबरोबर अभ्यासिकेचे विद्यार्थी एम.पी.एस.सी.च्या गट क च्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले असून जेईईमध्ये व एमएचटी-सीईटीमध्ये मध्ये प्रथम सायली कदम निट परिक्षेत ३५२ गुण जेईई मध्ये ८८.८८%,एमएचटी-सीईटीमध्ये मध्ये ९५% (बी एम एस पात्र ) मिळाल्याबद्दल पायल निकम,प्रतीक्षा निकम गव्हर्मेंट ॲग्रीकल्चर कॉलेज पुणे, जयदीप भवर गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज रत्नागिरी ईटीव टिसी,तृप्ती काळे,पुणे आयटी इंजिनिअरिंग, वैभवी घायतडक वृषाली रेडे,पी.डी.ई.ए.इंजिनिअरिंग कॉलेज पुणे,अंजली सुरवसे,डी.वाय पाटील पुणे,उत्कर्षा लष्करे संगमनेर इंजिनिअरिंग कॉलेज,सुजल अवसरे,अनंतराव पवार,पुणे इंजिनिअरिंग कॉलेज,सौरभ भोसले व्हि.के.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज,प्रथमेश जगताप अमोलक जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,राजनंदनी जिरेकर,अमोलक जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,सार्थक उगले बी.एस.सी.इरम शेख बी एससी काॅम्प्युटर सायन्स,आष्टी ,डोके साक्षी वी.पी इंजिनिअरिंग कॉलेज बारामती या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
    यावेळी डिप्लोमा काॅलेज चे प्राचार्य विकी घायतडक म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराची जोड असणे आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थी घडणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यासह आई वडील व संस्थेचे ना उज्वल करावे.
    संस्थेचे सचिव बाळासाहेब शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कॉलेजच्या कार्याचा अभिमान असल्याचे सांगितले.
    डॉ. गणेश बारगजे यांनी अभ्यासाबरोबरच चांगले संस्कार व परिस्थितीची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तसेच विजय भालेकर यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा व शिस्त ही यशाची त्रिसूत्री विद्यार्थ्यांसमोर मांडली.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज शिंदे, प्रा. अक्षय कुदळे व प्रा.हमिदा मुलाणी यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. गहिनीनाथ भोरे यांनी मानले.
Back to top button