📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सौ.के.एस.के.महाविद्यालयातील  पदव्युत्तर विषयांना विद्यापीठाची मान्यता  व प्रवेश प्रक्रिया सुरू

 सौ.के.एस.के.महाविद्यालयातील  पदव्युत्तर विषयांना विद्यापीठाची मान्यता  व प्रवेश प्रक्रिया सुरू

बीड ः  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,बीडच्या पदव्युत्तर विभागातील पुढील  विषयांना प्रवेशाची मान्यता दिली आहे. यात सूक्ष्मजीवशास्त्र, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, गणित, गृहशास्त्र, भूगोल, इंग्रजी, मराठी, हिंदी, संगीत,राज्यशास्त्र, एम.कॉम. या सर्व पदव्युत्तर विषयांना विद्यापीठातील त्रीसदस्यीय समितीने पहाणी करून महाविद्यालयातील पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेऊन अहवाल सादर केला त्या नंतर पदव्युत्तर विभागांना प्रवेशासाठी परवानगी दिली आहे.
तज्ञ प्राध्यापक,सुसज्य ग्रंथालय,मुलींचे वसतीगृह,अद्यावत प्रयोगशाळा,सर्व संगणीकीयकरण,क्रिडांगण  अशा सर्व सुविधानीयुक्त अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन नवगण शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष श्री.किशोर काळे, उपाध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,संस्थेचे सचिव डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर,सहसचिव डॉ.दीपा क्षीरसागर, पूजा भारतभूषण क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर प्रशासकीय अधिकारी डॉ.सुधाकर गुट्टे, डॉ.विश्वांभर देशमाने  तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ.खान ए.एस.,कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे,पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर सदरील विषयांना तात्काळ प्रवेश घ्यावा असे आवाहन  केले आहे.

Back to top button