बीड
महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपीस

महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपीस
सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा.
दिनांक ०१.१२.२०२० रोजी आरोपी याने महिलेचा वाईट हेतुने हात धरून व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील रा. पाडळी या गावचा रहिवासी असलेला आरोपी नामे. दत्ता भिमराव दुधाळ यास मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ मा. व्ही.एच. पाटवदकर साहेब यांनी दोषी ठरवून ६ महिने करावास व १,०००/ रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना कारावास एवढयाा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सहा सरकारी वकिल अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे यांनी काम पाहिले.
या प्ररकणी थोडक्यात हकिगत अशी की, दिनांक ०१.१२.२०२० रोजी दुपारी अंदाजे बारा वाजण्योच सुमारास मी पिण्याने पाणी पाडळी येथील बौध्दविहारा समोरील सरकारी बोर वरून पाणी भरून घरी जात असतांना आरोपी नामे. दत्ता भिमराव दुधाळ हा माठीमागुन मोटारसायकल वर येवून मला म्हणाला की, “ऐ राणी जरा बाजुला सरक” तेव्हा मी त्याला म्हणाले की, जरा निट बोलता येतः नाही का तेव्हा तो म्हणाला की, ये तुझे सारख्या भेडगीन माहारीनला काय निट बोलायचे, चल निह निघ नाहीतर ईथेच तुझा कार्यक्रम करीन, त्यानंतर आरोपी याने गाडीवरून खाली उतरून वाईट हेतुन हात धरून मला ओढाओढी करू लागला व मला म्हणाला की, तुझा कंड कसा जिरवायचा मला माहित आहे. त्यानंतर आरोपी याने माझे केस व साडीला धरून ओढाओढ सुरू केली व खाली पाडुन छातीवर डोक्यात बुक्याने हाणमार करून व जीवे मारण्याची धमकी दिली.
पिडीतेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे आरोपी विरूध्द कलम ३५४-अ, ३२३,५०४ भादवी आणि कलम ३(१) (आर), (एस), ३(१) (डब्यू) (आय) अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीवरून तात्कालील उपविभागीय अधिकारी आष्टी श्री. विजय लगारे यांनी या प्रकरणाचा तपास केला व जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणी सुनावर्णी जिल्हा व सत्र न्यायाधीश १ मा. व्ही.एच. पाटवदकर साहेब बीड यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण ०८ साक्षीदार तपासण्यात आले व सदर प्रकरणत पिडीता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांचा पुरावा व सहा सरकारी वकिल अजय श्रीमंतराव तांदळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश १ मा. व्ही.एच. पाटवदकर साहेब यांनी आरोपी यास कलम ३५४-अ, ३२३,५०४ भादवी आणि कलम 3(1) (r) (s), 3(1) (w) (i) अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ करीता ६ महिने साधा करावास व १,०००/रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास एवढ्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणात सहा सरकारी वकिल अजय श्रीमंतराव तांदळे यांनी काम पाहिले. उपविभागीय अधिकारी आष्टी श्री. विजय लगारे व पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती. सारीका ढाकणे व श्री. गव्हाणे यांनी सहकार्य केले.
(अॅड. अजय एस. तांदळे) सहा. सरकारी वकील, बीड



