बीड
विधानसभा निकालानंतर दिड वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली —अमरसिंह पंडित

विधानसभा निकालानंतर दिड वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली —अमरसिंह पंडित
जोडवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
================
गेवराई दि.२४ (प्रतिनिधी) जोडवाडीचा बंधारा आकाराने मोठा असुन हे काम झाल्यानंतर खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे खरिप आणि रब्बी हंगामात काम केले तर १०० एक्कर जमिनीला पाणी मिळेल. बंधारे बांधल्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी वाढणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. या बंधा-याचे काम अतिशय उत्तमपणे करणार असून यावर माझे जातीने लक्ष राहणार आहे. गावाचे स्थलांतर थांबविण्यासाठी आपण जलसंधारणाचे काम करणार असून तुम्ही उसाची शेती करण्यापेक्षा खरिप आणि रब्बीची शेती करा, माळव्याची शेती करा, या भागाचे अर्थकारण बदलून जाईल असा शब्द मी देतो. विधानसभेच्या निकालानंतर १४ महिन्यात आपण कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले. जोडवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करताना ते बोलत होते.
जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना ९७ लक्ष ४६ हजार व फिल्टर ५ लक्ष रुपये या पुर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ डिपीडीसी अंतर्गत ३० लक्ष रुपये, अंगणवाडी ११.२५ लक्ष रुपये, जोडवाडी अंगणवाडी ११.२५ लक्ष रुपये सैदापूर बंधाऱ्याच्या कामांचा भव्य शुभारंभ माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयकुमार घाडगे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जगन पाटील काळे, विकास सानप, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, सरपंच तुकाराम तळतकर, गणेश सावंत, उद्योजक बळीराम रसाळ यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
*विकासकामे डोळ्यासमोर ठेवून शिवछत्र परिवाराला साथ द्या—कालिदास नवले*
===============
याप्रसंगी बोलताना कालिदास नवले म्हणाले की, शिवछत्र परिवार जीव लावणारा आणि जिव्हाळा असणारा परिवार आहे. काम करणार नाही तर करुन दाखवणारा हा परिवार आहे. दर्जेदार विकास कामे. काम पडले तर शिवछत्र परिवार तुमच्या पाठीशी आहे. बीडने शिवछत्र परिवारावर विश्वास टाकला तेंव्हा विकास कामांसाठी २२ कोटी मिळाले. गेवराईला २२ पैसेही मिळाले नाही असा टोला विरोधकांचे नाव न घेता लगावला. कोण आपल्या कामाचा आहे हे आपल्याला कळले पाहिजे. जो परिवार तुमच्या सुख दुःखात सोबत राहतो, त्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये जी चुक झाली ती करु नका. विकास हीच जात आणि विकास हाच धर्म डोळ्यासमोर ठेवून शिवछत्र परिवाराला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
*अमरसिंह पंडित यांनी विकास कामांना गती दिली —-गणेश सावंत*
===============
यावेळी बोलताना गणेश सावंत म्हणाले की, विरोधकांचा एकच कार्यक्रम शिवछत्र परिवाराला बदनाम करायचा आहे, काम कांहीच नाही. शिवछत्र परिवार कुणाच्या ताटातले काढून घेणारा नाही तर प्रत्येकांच्या ताटात भरभरुन वाढणारा आहे. शिक्षण, शेती, पाणी, रस्ते आदी विकास कामांना गती देणारे अमरसिंह पंडित आहेत. जायकवाडीच्या पाण्यासाठी न्यायालयात जाणारा हा नेता असून आपण त्यांना भरभरून ताकद दिली पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्या कामाचा नेता आपल्याला ओळखता आला पाहिजे. अफवांना बळी न पडता शिवछत्र परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि अमरसिंह पंडित यांचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी माऊली नवले, बळीराम रसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन मेरड यांनी करुन उपस्थितांचे आभार सरपंच संदिपान दातखीळ यांनी मानले. या कार्यक्रमाला उपसरपंच अशोक हराळे, हानुमान मावसकर, महादेव हराळे, महादेव रडे, तिर्थराज, कृष्णा हराळे, गणपत दातखिळ, तात्यासाहेब हराळे, भागुजी काळे, सोमनाथ मावसकर यांच्यासह सैदापूर, जोडवाडी येथील नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()



