बीड

सावरगाव शिवारात ‘हायवे रॉबरी;काच फोडून चाकूच्या धाकावर लूट

सावरगाव शिवारात ‘हायवे रॉबरी;काच फोडून चाकूच्या धाकावर लूट
पोलिसांच्या वेगवान तपासामुळे दरोडा उघडकीस
जामखेड प्रतिनिधी:जामखेड-साकत रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक प्रकारात दरोडेखोरांनी ट्रकसमोर दुचाकी आडवी लावत चालकाला लक्ष्य करत चाकूच्या धाकावर लुटमार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिघा आरोपींना अटक केली आहे.
दि.३१/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे संतोष बिभीषण फरताडे धंदा ड्रायव्हर रा. सोमनाथ वाडी ता.जि. बीड यांनी फिर्याद दिली की, दि. ३०/०३/२०२६ रोजी मी व बाळू शामराव तांबे रा. परांडा जि.धाराशिव असे ट्रक क्र. एम एच- १४ एल एक्स ९९६९ ही मध्ये कोबंडीचे खादय घेवून पुणे येथून माजलगावकडे जात असताना दि.३१/०३/२०२६ रोजी रात्री ००.३० वा.चे सुमारास जामखेड ते साकत रोडने जामखेड पासून ५ की मी अंतरावर स्पीड ब्रेकर आल्याने आम्ही गालीचा स्पीड कमी केला तेंव्हा एक स्कुटीवरील स्वार हा त्याची स्कुटी घेवून आला व आमचे ट्रकसमोर समोर आडवी लावून आमची ट्रक थांबवली.आमची ट्रक थांबल्यानंतर मोटारसायकलवर इतर तीन लोक आले व त्यांनी ट्रकची काच फोडून आम्हाला मारहान करून चाकुचा धाक दाखवून बळजबरीने खिशातील रोख रक्कम व गाडीतील साहीत्य काढून घेतले. वैगेरे म // चे फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं.१७५/२०२६ बी एन एस कलम ३०९ (६),३२४(४), ३ (५), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना गुन्हा घडले ठिकाणी एक मोटारसायकल ही लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सदरच्या मोटारसायकल वरून सदरचा गुन्हा हा इसम नामे १) शुभम सुर्यभान चव्हाण २) शुभम ज्ञानोबा चव्हाण, ३) राम अशोक अडाले व एक अल्पवयीन विधीसंर्घषीत बालक सर्व रा. सावरगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी केला आहे.अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सदरची माहीती गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक/२०८७ रविंद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल /२४२७ देविदास पळसे, पोलीस कॉन्स्टेबल / ७५४ कुलदिप घोळवे, पोलीस कॉन्स्टेबल/१०१३ आकाश शेवाळे अशांना देवून सदरचे पथकाने तांत्रिक माहीतीच्या आधाराने आरोपी नामे शुभम सुर्यभान चव्हाण व राम अशोक अडाले यांना सोनेगाव ता.जामखेड परिसरातनू ताब्यात घेतले तसेच आरोपी नामे शुभम ज्ञानोबा चव्हाण यास सावरगाव डोंगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक किशोर गावडे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडू, पोलीस नाईक रविंद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बेल्हेकर, पोलीस कॉन्स्टेबल भागीरथ देशमाने, पोलीस कॉन्स्टेबल दत्तु बेलेकर, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर माने यांच्यासह होमगार्ड भारत चव्हाण, संदीप चव्हाण, गणेश गायकवाड, दिगंबर औचरे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी केली आहे.
Back to top button